IND vs NZ 1st Test : हे तर पाकिस्तानपेक्षा बेक्कार निघाले! टीम इंडियाच्या नावावर ५ लाजीरवाणे विक्रम, न्यूझीलंडच्या नावावर पराक्रम

India vs New Zealand 1st Test day 2 Marathi Updates : भारतीय संघाने बंगळुरू कसोटीत पार निराशाजनक कामगिरी केली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारताचे पाच फलंदाज खातेही न उघडता तंबूत परतले.
IND vs ENG 1st Test
IND vs ENG 1st Testesakal
Updated on

IND vs NZ 1st Test day 2 Marathi Updates : भारतीय संघावर पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात नामुष्कीचा सामना करावा लागला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांमसोर भारताचा पहिला डाव ४९ धावांवर गडगडला. मॅट हेन्री व विलियम्स रोकू यांनी मिळून ९ विकेट्स घेतल्या. घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध डरकाळी फोडणारे भारताचे वाघ न्यूझीलंडसमोर आज म्यांव म्यांव करताना दिसले. भारताने या कामगिरीसह पाकिस्तानच्या नावावर असलेला नाचक्कीवाला विक्रम आता स्वतःच्या नावावर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.