IND vs NZ 1st Test : पहिल्या डावात ४६ धावांवर भारतीय संघाचा डाव गडगडला होता, परंतु दुसऱ्या डावात त्यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात घेतलेल्या ३५६ धावांच्या आघाडीच्या प्रत्युत्तरात भारताने चहापानाच्या विश्रांतीपर्यंत बिनबाद ५७ धावा केल्या आहेत आणि २९९ धावांनी अजूनही संघ मागे आहे. न्यूझीलंडच्या डावात भारताचा यष्टिरक्षक ऋषभ पंत ( Rishabh Pant injury) याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो मैदानाबाहेर गेला होता आणि तिसऱ्या दिवशी तो मैदानावर क्षेत्ररक्षणासाठीही आला नाही. त्यामुळे तो या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यात ऋषभचा एक व्हिडीओ समोर आला आहे.