IND vs NZ 1st Test : आता आमची सटकली...! Virat Kohli - सर्फराज खान यांची तुफान फटकेबाजी; भारताचा न्यूझीलंडवर पलटवार

India vs New Zealand 1st Test : न्यूझीलंडच्या फलंदाजांनी बंगळुरूच्या खेळपट्टीवर दमदार खेळ केल्यानंतर भारताकडून दुसऱ्या डावात सडेतोड प्रत्युत्तर मिळाले...
virat kohli sarfaraz khan
virat kohli sarfaraz khanesakal
Updated on

IND vs NZ 1st Test : तुमचा खेळ झाला, आता आमचा टर्न... या आवेशात भारतीय फलंदाजांनी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमचे मैदान गाजवले. पहिल्या डावात ४६ धावांवर ऑल आऊट झालेल्या भारतीय संघावर टीका झाली. त्यात न्यूझीलंडने ४०२ धावांचा डोंगर उभा करून पहिल्या डावात ३५६ धावांची आघाडी घेतली. आता भारताचं काही खरं नाही, असंच वाटत होते. पण, रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी सकारात्मक सुरुवात करून दिली. त्यानंतर विराट कोहली-सर्फराज खान यांची गाडी सूसाट सुटली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून न्यूझीलंडचं टेंशन वाढवलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.