IND vs NZ 1st Test : Devon Conway चे शतक हुकले, पण टीम इंडियाला किवींनी रडवले; ऋषभच्या दुखापतीने टेंशन वाढवले

India vs New Zealand 1st Test day 2 : बांगलादेशविरुद्धच्या विजयाची नशा घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला बंगळुरू कसोटीत न्यूझीलंडने शुद्धीवर आणले.
IND vs NZ 1st Test : Devon Conway चे शतक हुकले, पण टीम इंडियाला किवींनी रडवले; ऋषभच्या दुखापतीने टेंशन वाढवले
Updated on

IND vs NZ 1st Test day 2 Marathi Updates : RCB च्या मैदानावर CSK CSK चा नारा आजही ऐकायला आला. भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यात डेव्हॉन कॉनवेला ( Devon Conway ) फुल सपोर्ट मिळालेला पाहायला मिळाला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस किवींनी गाजवला... भारताचा पहिला डाव ४६ धावांवर गुंडाळल्यानंतर कॉनवे मैदानावर उभा राहिला, प्रेक्षकांनी त्याचा उत्साह वाढवला.

न्यूझीलंडच्या मॅट हेन्री ( ५-१५) व विलियम रोकू ( ४-२२) यांनी ९ विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या कॉनवेचे शतक हुकले असले तरी न्यूझीलंडचे वर्चस्व राहिले. भारताच्या रवींद्र जडेजा, कुलदीप यादव व आर अश्विन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. त्यात भारताला आणखी एक धक्का बसला.. यष्टिरक्षक ऋषभ पंत हा वेदनेने व्हिवळत मैदानाबाहेर गेला. त्यामुळे भारताची डोकेदुखी आणखी वाढली आहे.

IND vs NZ 1st Test : Devon Conway चे शतक हुकले, पण टीम इंडियाला किवींनी रडवले; ऋषभच्या दुखापतीने टेंशन वाढवले
IND vs NZ 1st Test : न्यूझीलंडसमोर 'म्यांव म्यांव'! १३६ वर्षानंतर कसोटीत अशी नाचक्की होणारा भारत पहिलाच, 46 All OUT
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.