IND vs NZ 1st Test : नशीबानं थट्टा अशी मांडली...! Rohit Sharma ची विचित्र विकेट पडली, कॅप्टनलाही विश्वास बसेना

India vs New Zealand 1st Test: रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी भारताला दुसऱ्या डावात चांगली सुरूवात करून दिली. पण, चहापानाच्या ब्रेकनंतर दोन्ही सलामीवीर माघारी परतले.
IND vs NZ 1st Test
IND vs NZ 1st Testesakal
Updated on

IND vs NZ 1st Test: न्यूझीलंडच्या फलंदाजांनी धावांचा डोंगर उभारल्यानंतर टीम इंडियाकडून दमदार खेळ पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल या दोघांनी दुसऱ्या डावात भारताचा चांगली सुरुवातही करून दिली होती. पण, चहापानाच्या विश्रांतीनंतर सामन्याने कलाटणी घेतली. एजाज पटेलच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याचा यशस्वीचा प्रयत्न फसला आणि टॉम ब्लंडलने त्याला यष्टिचीत केले. त्यानंतर रोहितची दुर्दैवी विकेट पडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.