IND vs NZ: महाराष्ट्राची लेक चमकली ! तेजलने दिप्ती शर्मासह टीम इंडियाला सावरले

IND vs NZ 1st Womens ODI Match: न्यूझीलंडविरूद्धच्या वन-डे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडला २२८ धावांचे आव्हान दिले आहे.
womens team india
womens team indiaesakal
Updated on

IND vs NZ 1st Womens ODI Match: भारत-न्यूझीलंड महिला वन-डे मालिकेतील पहिला सामना आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघ आज स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा वन-डे सामना खेळत आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने २२७ धावा करून न्यूझीलंडला २२८ धावांचे आव्हान दिले आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या तेजल हसबनीसने ४१ धावांच्या खेळीने संघाचा पडता डाव सावरला. यामध्ये तिला ४२ धावा करणाऱ्या दिप्ती शर्माची साथ मिळाली.

सामन्याला सुरूवात झाली असून भारताने नोणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शफाली वर्मा व कर्णधार स्मृती मानधना भारताकडून सलामीसाठी आल्या. कर्णधार स्मृती मानधनाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. ती जेस केरच्या गोलंदाजीवर अवघ्या ५ धावा करून बाद झाली. त्यानंतर शफाली वर्मा व यास्तिका भाटीयाने भारताचा मोर्चा सांभाळला. पण, सातव्या षटकात शफाली (३३) झेलबाद झाली व भारताला ४९ धावांवर दुसरा धक्का मिळाला. शफालीनंतर ११ व्या षटकात यास्तिकाही ३७ धावा करून माघारी परतली. २५ षटकांच्या समाप्तीनंतर ४ बाद १४३ धावा अशी भारताची परिस्थिती होती.

त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्स व तेजल हसबनीसच्या जोडीने भारताचा घसरलेला डाव सावरण्यास सुरूवात केली. दोघींनी पाचव्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. पण, नंतर जेमिमाह(३५) पायचीत झाली. त्यानंतर तेजल व दिप्तीच्या जोडीने भारताची धावसंख्या २०० पार केली. तेजलने ६४ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. तर, दिप्ती शर्माने ५१ चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले आणि भारताला न्यूझीलंडने २२७ धावांवर रोखले.

भारतीय प्लेइंग इलेव्हन:

स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा, डी हेमलता, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, तेजल हसबनीस , सायमा ठाकोर, राधा यादव.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन:

सोफी डिव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, अमेलिया केर, लॉरेन डाऊन, मॅडी ग्रीन, जेस केर, हेले जेन्सन, ली ताहूहू, मॉली पेनफोल्ड, हॅना रोवे, ब्रुक हॅलीडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.