India vs New Zealand test: बंगळूर कसोटी सामन्यात मोठा पराभव स्वीकारलेला भारतीय संघ चेहऱ्यावरची निराशा झाकत तर सामना जिंकून कमाल साधलेला न्यूझीलंड संघ प्रसन्न चेहऱ्याने पुण्याला पोहोचले. भारतीय संघही पुण्यात दाखल झाला; परंतु त्यांना विश्रांती नव्हती, कारण संघाचे मुख्य प्रायोजकांच्या जाहिरातीचे शूटिंग लगेच आयोजित करण्यात आले होते.
प्रशिक्षक आणि कप्तान यांच्या मनात मात्र दुसऱ्या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीचे आणि संघात काय बदल करायला हवेत याचे विचार घोळायला लागले होते.
बंगळूरच्या खेळपट्टीच्या स्वभावाचा फायदा यजमान संघापेक्षा पाहुण्या संघाच्या वेगवान गोलंदाजांनी जास्त उचलला. दुसऱ्या सामन्यासाठी जरा फिरकीला अजून मदत करणारी खेळपट्टी बनवली जाण्याचे विचार लगेच फेर धरू लागले.