IND vs NZ 2nd Test : अरे, नेट बॉलरही त्रिफळा उडवतोय! Virat Kohli ची विकेट पाहून चाहते चिंतित, Video

India vs New Zealand 2nd Test Pune : आर अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या उल्लेखनीय गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी सामन्यावर पकड घेतली आहे.
IND vs NZ 2nd Test
IND vs NZ 2nd Testesakal
Updated on

India vs New Zealand 2nd Test : भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करण्यासाठी न्यूझीलंडला कडवी टक्कर देतोय आणि पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केली आहे. डेव्हॉन कॉनवे व रचीन रवींद्र यांच्या अर्धशतकी खेळीने न्यूझीलंडला चांगली धावसंख्या उभारून दिली आहे.न्यूझीलंडच्या फलंदाजांची अवस्था पाहता भारताच्या खेळाडूंचाही कस लागेल हे चित्र दिसतेय. या कसोटीत नेहमीप्रमाणे विराट कोहलीवर ( Virat Kohli) सर्वांच्या नजरा खिळल्या असतील. त्यात पुण्यात कसोटी असल्याने त्याच्याकडून २०१९च्या कसोटीतील खेळीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. पाचवर्षापूर्वी पुणे कसोटीत विराटने २५४ धावांची नाबाद खेळी केली होती आणि ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.