IND vs NZ 2nd Test : वॉशिंग्टन सुंदर आला धावून, पण टीम इंडियाचे फलंदाज गेले वाहून! न्यूझीलंडकडे मजबूत आघाडी

India vs New Zealand 2nd Test : पाहुण्या न्यूझीलंड संघाने दुसऱ्या कसोटीत मजबूत आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात ७ विकेट्स घेणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने दुसऱ्या डावातही ४ विकेट्स घेतल्या आहेत, पण...
IND vs NZ 2nd Test
IND vs NZ 2nd Testesakal
Updated on

India vs New Zealand 2nd Test : भारतीय संघ पुणे कसोटीत पूर्णपणे बॅकफूटवर फेकला गेला आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावातील १०३ धावांच्या आघाडीत मोठी भर घातली आहे आणि भारतीय संघाला विजयासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. पहिल्या डावात ७ विकेट्स घेणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने ( Washington Sundar ) दुसऱ्या डावातही उल्लेखनीय कामगिरी केली. पण, अन्य गोलंदाजांकडून त्याला अपेक्षित साथ मिळालेली नाही. न्यूझीलंडचा कर्णधार Tom Latham चे शतक थोडक्यात हुकले, पण, न्यूझीलंडने तीनशेपार आघाडी घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.