India vs New Zealand 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारी (२४ ऑक्टोबर) सुरुवात झाली होती. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
न्यूझीलंडकडून कर्णधार टॉम लॅथम आणि डेवॉन कॉनव या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती. त्यांनी सुरुवातीला भारताच्या वेगवान गोलंदाजांना यश मिळू दिले नव्हते.
त्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने आर अश्विन या अनुभवी फिरकीपटूला गोलंदाजीला बोलावले आणि त्याचा फायदा झाला. अश्विनने आठव्या षटकात टॉम लॅथमला १५ धावांवरच पायचीत केले.