IND vs NZ Pune Test: बुमरँग! भारत आपल्याच फिरकीच्या जाळ्यात All Out झाला ; मिचेल सँटनरच्या ७ विकेट्सने सारेच गांगरले

Mitchell Santner wickets 7 haul : भारताविरुद्ध न्यूझीलंडने पुणे कसोटीत १०३ धावांनी आघाडी मिळवण्यात यश मिळवलं आहे. मिचेल सँटेनरने ७ विकेट्स घेत महत्त्वाचे योगदान दिले.
New Zealand
New ZealandSakal
Updated on

India vs New Zealand Pune Test: भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध गुरुवारपासून (२४ ऑक्टोबर) सुरु झालेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात फिरकी गोलंदाजीविरुद्ध संघर्ष करताना दिसले. या सामन्यात भारतीय संघाला १५० धावांचा टप्पा पार करण्यासाठीही भारतीय फलंदाजांना झगडावं लागल्याचं दिसलं.

भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी ४५.३ षटकात १५६ धावांवर संपला. त्यामुळे न्यूझीलंडने १०३ धावांची आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडकडू मिचेल सँटेनरने ७ विकेट्स घेत लक्षवेधी कामगिरी केली.

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात पहिल्या दिवशी न्यूझीलंड संघ २५९ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर भारताने पहिल्या दिवस अखेर ११ षटकात १ बाद १६ धावा केल्या होत्या. यापुढे भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी खेळायला सुरूवात केली.

New Zealand
IND vs NZ 2nd Test : ७ बाद १०३ धावा! Yashasvi Jaiswal ने इतिहास रचला, पण विराटसह इतरांनी पार केला कचरा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.