IND vs NZ 2nd Test Rishabh Pant will miss Pune Test : भारतीय संघाला कसोटी मालिकेत कायम राहण्यासाठी आता न्यूझीलंडविरुद्धची पुढील कसोटी जिंकावी लागणार आहे. २४ ऑक्टोबरपासून पुण्यात दुसरी कसोटी सुरू होणार आहे, परंतु टीम इंडियाच्या डोकेदुखीत भर पडली आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवरील कसोटीत यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. तो फलंदाजीला येईल की नाही याबाबत शंका होती, परंतु त्याने ९९ धावांची खेळी करून भारताला आघाडी मिळवून दिली होती. पण, ऋषभ दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. त्याच्याबाबतीच संघ व्यवस्थापनाला कोणताच धोका पत्करायचा नाही.