Video : '१२ साल मे एक बार allowed है...'! पराभवानंतर Rohit Sharma चं विधान अन् नेटकऱ्यांकडून जोरदार धुलाई

India vs New Zealand 2nd Test : भारतीय संघ १२ वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका हरला. न्यूझीलंडच्या संघाने बंगळुरू पाठोपाठ पुणे कसोटीतही दणदणीत विजयाची नोंद केली.
IND vs NZ 2nd Test
IND vs NZ 2nd Test esakal
Updated on

Rohit Sharma on series defeat against New Zealand : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पुणे कसोटीत ११३ धावांनी पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडच्या मिचेल सँटरनरे दोन्ही डावांत मिळून १३ विकेट्स घेतल्या आणि संघाला मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. २०१२ नंतर भारताचा हा घरच्या मैदानावरील पहिला कसोटी मालिका पराभव ठरला. भारताच्या फलंदाजांनी पुन्हा निराशाजनक कामगिरी केली आणि त्यांना ३५९ धावांचे लक्ष्य पेलवले नाही. भारताचा संघ २४५ धावांत तंबूत परतला. या पराभवानंतर कर्णधार रोहितने संघाचा बचाव केला आणि त्यासाठी त्यानं केलेल्या विधानाने गदारोळ माजवला आहे. नेटिझन्सने रोहितची जोरदार धुलाई सुरू केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.