IND vs NZ 2nd Test : Washington Sunder चा आणखी एक पराक्रम; मागील १६ वर्षांत अश्विन वगळता कोणालाच जमला नव्हता असा विक्रम

India vs New Zealand 2nd Test : न्यूझीलंड संघाने दुसऱ्या कसोटीत वर्चस्व गाजवले आहे आणि भारताकडून वॉशिंग्टन सुंदर हा एकटा झुंज देताना दिसतोय.
IND vs NZ 2nd Test
IND vs NZ 2nd Testesakal
Updated on

India vs New Zealand 2nd Test : पुण्यातील कसोटीत न्यूझीलंडचा पूर्णपणे दबदबा दिसतोय. पहिल्या डावातील १०३ धावांच्या आघाडीत न्यूझीलंडने ३६ षटकांत १५४ धावांची भर घातली आहे. भारताचा संघ घरच्या मैदानावर पुन्हा एकदा बॅकफूटवर गेलेला दिसतोय आणि वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sundar ) हा एकटा किवींचा मुकाबला करतोय, असे जाणवतंय. पहिल्या डावात ७ विकेट्स घेणाऱ्या सुंदरने दुसऱ्या डावातही किवींच्या ३ फलंदाजांना माघारी पाठवले आहे. त्याने या कामगिरीसह मागील १६ वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये आर अश्विन वगळता अन्य कोणत्याच भारतीय ऑफ स्पिनरला न जमलेला विक्रम नोंदवला आहे. २००८ मध्ये हरभजन सिंगने असा पराक्रम केला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.