IND vs NZ 2nd Test : ७ बाद १०३ धावा! Yashasvi Jaiswal ने इतिहास रचला, पण विराटसह इतरांनी पार केला कचरा

India vs New Zealand 2nd Test : न्यूझीलंडच्या फिरकीपटूंसमोर भारतीय खेळाडूंनी पाट्या टाकल्या आहेत. विराट कोहली व ऋषभ पंत यांची विकेट पाहून डोक्यावर हात मारायची वेळ आली आहे.
IND vs NZ 2nd Test
IND vs NZ 2nd Test esakal
Updated on

India vs New Zealand 2nd Test : रोहित शर्मा भोपळ्यावर माघारी परतल्यानंतर यशस्वी जैस्वाल व शुभमन गिल यांनी डाव चांगला सावरला होता. पण, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात मिचेल सँटनरने न्यूझीलंडला पहिले यश मिळवून दिले. शुभमनला पायचीत केल्यानंतर सँटनरने एकामागून एक धक्के दिले आणि भारताचे ७ फलंदाज १०३ धावांवर तंबूत परतले. विराट कोहली व ऋषभ पंत हे तर सरळ चेंडूंवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचीत झाले. त्यांचे शॉर्ट सिलेक्शन पाहून चाहत्यांनी डोक्यावर हात मारले. यशस्वीने आजच्या सामन्यात विक्रमी कामगिरी केली, परंतु अन्य फलंदाजांच्या हाराकिरीमुळे त्यावर पाणी फिरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.