India vs New Zealand 3rd Test : आघाडीचे फलंदाज ढेपाळल्यानंतर ऋषभ पंत व शुभमन गिल या युवा फलंदाजांनी भारताचा डाव सावरला आहे. न्यूझीलंडच्या २३५ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४ फलंदाज गमावले होते. पण, ऋषभ व शुभमन ही जोडी मैदानावर उभी राहिली आहे. दोघांनीही वैयक्तिक अर्धशतकं पूर्ण करताना शतकी भागीदारीच्या दिशेने वाटचाल केली आहे. ऋषभने अर्धशतकासह अनेक विक्रमांनाही गवसणी घातली.