IND vs NZ 3rd Test : सरावाला 'दांडी', चालणार नाही! मालिका गमावल्यानंतर आली जाग, गौतम गंभीरला आलाय राग

No optional training : भारतीय संघाने घरच्या मैदानावरील न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावली आहे. बंगळुरू आणि पुणे कसोटीत पाहुण्या न्यूझीलंडने विजय मिळवला आहे आणि आता तिसरी कसोटी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
IND vs NZ 2nd Test
IND vs NZ 2nd Testesakal
Updated on

India vs New Zealand 3rd Test Wankhede : भारतीय संघाला घरच्या मैदानावर १२ वर्षांनंतर कसोटी मालिका गमवावी लागली आहे. भारताने या कालावधीत १८ मालिका जिंकल्या आणि हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. पण, न्यूझीलंडने हा विजयरथ रोखला आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळण्याचे भारताचे स्वप्न अवघड केले आहे. भारताला आता उर्वरित ६ कसोटीत ( १ वि. न्यूझीलंड व ५ वि. ऑस्ट्रेलिया) ४ सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे घरच्या मैदानावरील अखेरच्या कसोटीत विजय मिळवण्याचा निर्धार भारताने केला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या तिसरा कसोटी सामना होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.