IND vs NZ, 3rd Test: जडेजाच्या ५ अन् वॉशिंग्टनच्या ४ विकेट्स; पहिल्याच दिवशी किवींचा डाव गडगडला, आता भारताच्या फलंदाजांची कसोटी

Ravindra Jadeja 5 Wickets in IND vs NZ 3rd Test: मुंबई कसोटीत भारताविरुद्ध पहिल्याच दिवशी न्यूझीलंडचा डाव संपुष्टात आला. या डावात रविंद्र जडेजाने ५ विकेट्स घेत कपिल देव यांचा विक्रमही मोडला.
India vs New Zealand 3rd test at Mumbai
India vs New Zealand 3rd test at MumbaiSakal
Updated on

India vs New Zealand 3rd Test at Mumbai: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना शुक्रवापासून खेळला जात असून पहिल्याच दिवशी पाहुण्या संघाचा पहिला डाव संपला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना होत असून या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात ६५.४ षटकात सर्वबाद २३५ धावा केल्या.

भारताकडून पहिला दिवस रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी गाजवला. या दोघांनी मिळून ९ विकेट्स घेतल्या.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने भारतीय संघ गोलंदाजीसाठी उतरला. या सामन्यात सुरुवातीच्या काही षटकांतनंतर भारताच्या फिरकी गोलंदाजांचा बोलबाला दिसून आला.

वॉशिंग्टन सुंदर आणि रविंद्र जडेजा यांनी टिच्चून गोलंदाजी केली, ज्यांना आर अश्विनकडूनही साथ मिळाली. दरम्यान, भारताच्या फिरकी गोलंदाजांबरोबरच मुंबईच्या उष्णतेमुळेही न्यूझीलंडचे खेळाडू त्रासलेले दिसले.

India vs New Zealand 3rd test at Mumbai
IND vs NZ 3rd Test: वानखेडेच्या कसोटीत २४ वर्षांनी जुळून आला योगायोग; मुंबईकर खेळाडूंमुळे झालं शक्य
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.