IND vs NZ 3rd Test Sarfaraz Khan : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि विल यंगच्या अर्धशतकाने भारतीय गोलंदाजांना आव्हान दिले. आकाश दीपने भारताला पहिले यश मिळवून देताना डेव्हॉन कॉनवेला पायचीत केले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने दोन धक्के दिले. रवींद्र जडेजाने महत्त्वाची विकेट मिळवून देताना यंगला ७१ धावांवर माघारी पाठवले. पण, या सामन्यात एका विचित्र राड्याने सर्वांचे लक्ष वेधले.
या कसोटीत रोहित शर्मा, सर्फराज खान आणि यशस्वी जैस्वाल हे तीन मुंबईकर एकत्र घरच्या मैदानावर खेळत आहेत. फेब्रुवारी २००० नंतर असे प्रथमच घडले आहे. अशात घरचं मैदान म्हटलं की सर्फराज खान सुटणारच. तो सिली पॉइंटला उभं राहून किवी फलंदाजांची जोरदार स्लेजिंग करत होता. पण, डॅरील मिचेलला त्याचे हे सततचे बोलणे नाही आवडले आणि त्याने अम्पायरकडे तक्रार केली. अम्पायर सर्फराजला ताकीद देत असताना कर्णधार रोहित तिथे आला अन्...