India vs New Zealand 3rd Test : भारत-न्यूझीलंड तिसरी कसोटी रोमांचक वळणावर आली आहे. पहिल्या डावातील २८ धावांची पिछाडी भरून काढताना न्यूझीलंडने दुसऱ्या डावात २ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर आर अश्विन ( R Ashwin ) आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) या अनुभवी गोलंदाजांनी उल्लेखनीय मारा केला. या दोघांच्या फिरकीसमोर विल यंग ( Will Young) उभा राहिला, परंतु किवींचे अन्य फलंदाज अडखळले. गोलंदाजीसह अश्विनने क्षेत्ररक्षणात घेतलेला अविश्वसनीय झेल, हा या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला. डॅरिल मिचेलच्या त्या विकेटने सामना पूर्णपणे किवींच्या हातून खेचून आणला आहे.