मुंबई : बंगळूरमध्ये विस्कटलेली घडी ठीक करता करता भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावली. आता मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटीसाठीही अंतिम संघ रचना करताना भारतीय संघ व्यवस्थापनासमोर पेच असणार आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला मुंबईतील कसोटीसाठी पाचारण करण्यात आले आहे. त्याला अंतिम संघात स्थान दिले जाईल, मग त्यासाठी आकाश दीपला वगळले जाणार की बुमराला विश्रांती दिली जाणार किंवा तीन वेगवान गोलंदाजांसह भारतीय संघ खेळणार, हा प्रश्न आहे.