IND vs NZ: वानखेडेवर Ajaz Patel ने रचला इतिहास; ठरला न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार

IND vs NZ 3rd Test : मुंबईमधील अंतिम कसोटीत न्यूझीलंडने भारताचा २५ धावांनी पराभव केला आणि भारताला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हॉईट वॉश केले.
Ajaz patel.
Ajaz patelesakal
Updated on

IND vs NZ 3rd Test Ajaz Patel Record: मुंबई मधील तिसरा व अंतिम कसोटी सामना जिंकून न्यूझीलंडने भारतीय मैदानावर इतिहास रचला आहे. न्यूझीलंडन तब्बल २४ वर्षांनी भारताला कसोटी मालिकेत व्हाईट वॉश करणारा संघ ठरला. न्यूझीलंडच्या या विजयात महत्वाचे योगदान देणाऱ्या फिरकीपटू एजाज पटेलने वानखेडे स्टेडियमवर विक्रम रचला. तो भारतातील एका स्टेडियममध्ये सर्वाधिक विकेट घेणारा विदेशी गोलंदाज ठरला आहे. या यादीत त्याने इंग्लंडचा माजी गोलंदाज इयान बोथमला मागे टाकले. रवींद्र जडेजाची विकेट घेत एजाजने हा विक्रम केला.

एजाज पटेलने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत २४ विकेट्स घेतल्या आहेत. याच मैदानावर गेल्या भारतीय दौऱ्यात त्याने एका डावात १० विकेट घेत इतिहास रचला होता. अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा पहिला आणि जगातील तिसरा गोलंदाज ठरला. त्यावेळी एजाजने दोन्ही डावात १४ विकेट घेतल्या होत्या. या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने ५ विकेट्स घेतले आणि शेवटच्या डावात भारताचे ६ विकेट्स घेण्यात त्याला यश आले.

Ajaz patel.
IND vs NZ, 3rd Test: भारतीय संघाला व्हाईटवॉश! न्यूझीलंडने वानखेडे स्टेडियमवरही फडकवला विजयी पताका, पंतचे अर्धशतक व्यर्थ

भारतीय मैदानावर विदेशी गोलंदाजांनी घेतलेले सर्वाधिक विकेट :

२४ एजाज पटेल, वानखेडे

२२ इयान बोथम, वानखेडे

१८ रिची बेनॉड, ईडन गार्डन

१७ कर्टनी वॉल्श, वानखेडे

भारत विरूद्ध न्यूझीलंड

पहिल्या डावातील न्यूझीलंडच्या २३५ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने २६३ धावा केल्या व सामन्यात २८ धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडचा दुसरा डावही लवकर गुंडाळण्यात भारताला यश आले. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात १७४ धावा करत भारताला १४७ धावांचे सोप लक्ष्य दिले. पण, या सोप्या लक्ष्याचा पाठलाग भारतीय संघ करू शकला नाही. ऋषभ पंत व्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. ऋषभ पंतने ६४ धावांची खेळी केली, पण इतर फलंदाजांकडून त्याला साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला २५ धावांनी सामना गमवावा लागला आणि न्यूझीलंडने ३ सामन्यांच्या मालिकेत भारताला व्हाईट वॉश केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()