India vs New Zealand Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सध्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजीविरुद्ध संघर्ष करताना दिसले.
भारताचा पहिला डाव ४५.३ षटकात १५६ धावांवर संपुष्टात आला. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीलाही फार काही खास करता आलं नाही. त्याच्या विकेटनंतर त्याला माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेने एक सल्लाही दिला आहे.
विराट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (२५ सप्टेंबर) मिचेल सँटेनरने टाकलेल्या लो फुलटॉस चेंडूवर त्रिफळाचीत झाला. विराट सँटेनरने टाकलेला चेंडू समजू शकला नाही आणि चेंडू त्याच्या मधल्या आणि लेग स्टम्पच्या मध्ये लागला. विराटलाही त्याही ही विकेट पाहून आश्चर्य वाटले होते. तो ९ चेंडूत केवळ १ धाव करून माघारी परतला.