IND vs NZ 1st Test day 1 Marathi Updates : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचे दोन सत्र पावसामुळे वाया गेली आहेत. एकही चेंडू न टाकता लंच ब्रेक घेतला गेला आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत २-० असा दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ घरचं मैदान पुन्हा गाजवण्यासाठी तयार झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत टीम इंडियाचा आक्रमक पवित्रा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण, पावसामुळे चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फिरवले आहे. दोन सत्र वाया गेल्यानंतर कव्हर्स हटवण्यात आले होते, पाऊस आता विश्रांती घेतोय असे चिन्ह दिसत असताना वरुण राजा पुन्हा बरसले. त्यामुळे अखेरीस आजच्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला गेला.
१९५५ ते २०२१ या कालावधीत घरच्या मैदानावर IND vs NZ यांच्यात झालेल्या ३६ कसोटीत भारताने १७ जिंकल्या आहेत, तर २ गमावल्या आहेत. १७ कसोटी ड्रॉ राहिल्या आहेत. पहिल्या कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्याची दोन सत्र पावसात वाया गेल्यानंतर कव्हर्स हटवले गेले होते. पण, पावसाचा लपंडाव सुरू राहिल्याने पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला गेला. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार उद्याचा खेळ लवकर सुरू होणार आहे. सकाळी ८.४५ वाजता नाणेफेक होईल, तर ९.१५ वाजता दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होईल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे.
भारत - रोहित शर्मा ( कर्णधार), जसप्रीत बुमराह ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
न्यूझीलंड - डेव्हॉन कॉनवे, केन विलियम्सन, मार्क चॅम्पमन, विल यंग, डॅरील मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, रचीन रवींद्र, टॉम ब्लंडल, अजाझ पटेल, बेन सिर्स, मॅट हेन्री, टीम साऊदी, विलियम ओ'रौर्क
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.