IND vs NZ: हरमनप्रीत संघात असताना Smriti Mandhana कर्णधार कशी ?

IND vs NZ 1st ODI Match: भारतीय महिला संघ आज न्यूझीलंडविरूद्ध वन-डे मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. ज्यामध्ये स्मृती मानधनाकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
harmanpreet and smriti
harmanpreet and smritiesakal
Updated on

IND vs NZ 1st ODI Match: भारतीय महिला संघ आज न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज पहिल्याच सामन्यात भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर १७ खेळाडूंच्या संघामध्ये असताना, तिला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे आणि स्मृती मानधनाकडे संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कर्णधार स्मृती मानधना पहिल्यांदाच वन-डे क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. तर आज तब्बल २२ वर्षांनंतर भारतीय महिला कर्णधार सालामीसाठी आल्याचे पहायाला मिळाले. याआधी अंजुम चोप्राने २००२ मध्ये इंग्लंडविरूद्ध कर्णधारपदी असताना सलामीसाठी आली होती. किरकोळ दुखापतीमुळे हरमनप्रीतला संघातून वगळल्याचे बीसीआयने सांगितले.

सामन्याला सुरूवात झाली असून भारताने नोणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शफाली वर्मा व कर्णधार स्मृती मानधना भारताकडून सलामीसाठी आल्या. कर्णधार स्मृती मानधनाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. ती जेस केरच्या गोलंदाजीवर अवघ्या ५ धावा करून बाद झाली. त्यानंतर शफाली वर्मा व यास्तिका भाटीयाने भारताचा मोर्चा सांभळला. पण, सातव्या षटकात शफली (३३) झेलबाद झाली व भारताला ४९ धावांवर दुसरा धक्का मिळाला. शफालीनंतर ११ व्या षटकात यास्तिकाही ३७ धावा करून माघारी परतली. भारत २५ षटकांच्या समाप्तीनंतर ४ बाद १४३ धावांवर खेळत आहे.

भारतीय प्लेइंग इलेव्हन:

स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा, डी हेमलता, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, तेजल हसबनीस , सायमा ठाकोर, राधा यादव.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन:

सोफी डिव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, अमेलिया केर, लॉरेन डाऊन, मॅडी ग्रीन, जेस केर, हेले जेन्सन, ली ताहूहू, मॉली पेनफोल्ड, हॅना रोवे, ब्रुक हॅलीडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.