IND vs NZ 1st Womens ODI Match: भारत-न्यूझीलंड महिला वन-डे मालिकेतील पहिला सामना भारताने ५९ धावांनी जिंकला. नुकत्याच झालेल्या महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने विजेतेपद पटकावले. वर्ल्ड कप मधील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने भारतावर मात केली. पण, आज भारताने वन-डे मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केले. हा सामना महाराष्ट्राच्या तेजल हसबनीसने गाजवला. ती या सामन्यात सर्वाधिक धावा (४२) करणारी खेळाडू ठरली. तर सामन्यात ४१ धावा व १ विकेट घेणारी दिप्ती शर्मा सामनावीर ठरली.
भारताने नोणेफेक जिंकून न्यूझीलंडविरूद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शफाली वर्मा व कर्णधार स्मृती मानधना भारताची सलामीजोडी मैदानात फलंदाजीसाठी आली. फलंदाजीला येताच कर्णधार स्मृती मानधना ५ धावा करून बाद झाली. त्यानंतर शफाली वर्मा व यास्तिका भाटीयाने भारताचा डाव सांभाळला. पण, सातव्या षटकात शफाली (३३) झेलबाद झाली, तर ११ व्या षटकात यास्तिका (३७) माघारी परतली. २५ षटकांच्या समाप्तीनंतर ४ बाद १४३ धावा अशी भारताची स्थिती होती.
त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्स व तेजल हसबनीसच्या जोडीने भारताचा घसरलेला डाव पुन्हा उभारण्यास सुरूवात. स्थिरावलेली धावसंख्या जलद गतीने पुढे सरकत होती. पुढे जेमिमाह(३५) पायचीत झाली आणि वाटले की खेळी पुन्हा ब्रेक लागणार. पण, महाराष्ट्राची कन्या तेजलने दिप्ती शर्माला जोडीला घेत भारताची धावसंख्या २०० पार केली. तेजलने ६४ चेंडूत ४२ धावा केल्या. तर, दिप्ती शर्माने ५१ चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले. भारताने ४५व्या षटकात सर्व विकेट्स गमावले आणि न्यूझीलंडने २२७ धावांवर रोखले.
२२८ धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंड संघाला आपला पहिला विकेट अवघ्या ७ धावांवर गमवावा लागला. सुझी बेट्स १ धाव करून माघारी परतली. जॉर्जिया प्लिमर व लॉरेन डाऊन हिने (२५), (२६) धावांची खेळी केली. तर कर्णधार सोफी डिव्हाईन (२) धावचीत झाली. १९ व्या षटकात ४ बाद ७९ अशी न्यूझीलंडची परिस्थिती होती.
त्यानंतर ब्रुक हॅलिडे व मॅडी ग्रीनने ४९ धावांची भागिदारी करत न्यूझीलंडच्या मरगळलेल्या डावाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. ३० व्या षटकात दोघींनाही तंबूत परतावे लागले. त्यानंतर अमेलिया केर(२५) अखेरपर्यंत खेळत राहीली. पण, दुसऱ्या बाजूने न्यूझीलंडचा डाव घरंगळला व भारताने सामना ५९ धावांनी जिंकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.