IND vs NZ: नशीबानं संधी मिळाली अन् Mitchell Santner ने ७ विकेट्स घेत सोनं केलं; भारताविरुद्ध मोठ्या विक्रमांना घातली गवसणी

Mitchell Santner 7 Wickets Record: पुणे कसोटीत मिचेल सँटेनरने पहिल्या डावात न्यूझीलंडसाठी भारताविरुद्ध ७ विकेट्स घेत मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
Mitchell Santner | India vs New Zealand Pune Test
Mitchell Santner | India vs New Zealand Pune TestSakal
Updated on

India vs New Zealand Pune Test: भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध पुणे येथे दुसरा कसोटी सामना खेळताना पहिल्या डावात ४५.३ षटकात १५६ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताला या सामन्यात १०३ धावांची पिछाडी स्वीकारावी लागली आहे.

न्यूझीलंड संघ पहिल्या डावात २५९ धावांवर सर्वबाद झाला होता. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत या डावात मिचेल सँटनर चमकला. त्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करताना ७ विकेट्स घेतल्या. यासह त्याने मोठ्या विक्रमांनाही गवसणी घातली.

विशेष म्हणजे या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीला छोटी दुखापत असल्याने मिचेल सँटेनरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती. सँटेनरनेही या संधीचा पुरेपूर फायदा उचलला आहे.

सँटेनरने १९.३ षटके गोलंदाजी करताना ५३ धावा खर्च केल्या आणि ७ विकेट्स घेतल्या. ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधीलच नाही, तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही एका डावातील सर्वोत्तम गोलंदाजी आहे.

त्याचबरोबर भारताच न्यूझीलंड गोलंदाजाने कसोटीत नोंदवलेले हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन आहे. तसेच एकूण भारताविरुद्धचेही न्यूझीलंड गोलंदाजाने केलेलं हे तिसऱ्या क्रमांकाचं सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन आहे.

Mitchell Santner | India vs New Zealand Pune Test
IND vs NZ Pune Test: बुमरँग! भारत आपल्याच फिरकीच्या जाळ्यात All Out झाला ; मिचेल सँटनरच्या ७ विकेट्सने सारेच गांगरले
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.