New Zealand praised by Sachin Tendulkar: भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका न्यूझीलंडने आपल्या नावे केली. बंगळूरू येथे झालेला पहिला सामना न्यूझीलंडने ८ विकेट्सने जिंकला. तर पुण्यातील दुसऱ्या कसोटीत ११३ धावंनी बाजी मारली आणि त्याचबरोबर मालिकेतही विजय मिळवला. भारताने तब्बल १२ वर्षांनी घरच्या मैदानावरील मालिका गमावली. ४३३१ दिवस अपराजीत राहीलेल्या भारताला पराभूत करून न्यूझीलंडने आज इतिहास रचला. भारताला घरच्या मैदानावर हरवण्याचा पराक्रम करणाऱ्या न्यूझीलंडचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही कौतुक केले.
सचिन तेंडूलकर ट्विट करत म्हाणाला, "कोणत्याही पाहुण्या संघासाठी भारतात कसोटी मालिका जिंकणे हे एक स्वप्न असते आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी न्यूझीलंडने खरोखरच चांगला खेळ केला. असे यश केवळ चांगल्या, अष्टपैलू सांघिक प्रयत्नांनीच मिळू शकते. १३ विकेट्स घेणाऱ्या सँटनरच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याचा विशेष उल्लेख. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल न्यूझीलंडचे अभिनंदन!"
गेल्या १२ वर्षात भारताने घरच्या मैदानावर सलग १८ मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे मायदेशात सर्वाधिक सलग कसोटी मालिका जिंकण्याचा विश्वविक्रमही भारताच्या नावावर आहे. पण, न्यूझीलंडने भारताला २-०ने पराभूत करून भारताच्या विजयी विक्रमात खंड पाडला. शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार असून न्यूझीलंडकडे भारताला मालिकेत व्हाईट वॉश करण्याची संधी आहे.
दुसरा कसोटी सामना
पुणे कसोटीत न्यूझीलंडने फलंदाजी करत सामन्याची सुरूवात केली. न्यूझीलंडने पहिल्या डावात २५९ धावा केल्या. ज्यामध्ये डेव्हॉन कॉनवेच्या (७६) व रचिन रविंद्रच्या (६५) धावांचे योगदान आहे. तर या डावात भारताच्या वॉशिंग्टन सुंदरने ७ विकेट्स घेतले. प्रत्युत्तरात भारताला अवघ्या १५६ धावा करता आल्या. त्यामुळे न्यूझीलंडने सामन्यात १०३ धावंची आघाडी घेतली. यावेळी मिचेल सॅंटनरला भारताच्या ७ विकेट्स घेण्यात यश आले.
दुसऱ्या डावात टॉम लॅथमच्या ८६ धावांच्या खेळीने न्यूझीलंडने २५५ धावा केल्या व आघाडी ३५८ धावांची केली. पण भारतीय संघ लक्ष्याच्या जवळपासही पोहचू शकला नाही. भारताचा डाव २४५ धावांवर संपुष्टात आला आणि न्यूझीलंडने ११३ धावांनी विजय मिळवला. याही डावात सॅंटनरने भारताचे ६ विकेट्स घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.