IND vs NZ Test: तिसऱ्या दिवशी जडेजाची कमाल अन् न्यूझीलंड All-Out; मात्र टीम इंडियासमोर मालिका पराभव टाळण्यासाठी अवघड लक्ष्य

India vs New Zealand Pune Test: पुण्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात न्यूझीलंड संघ सर्वबाद झाला आहे. मात्र असं असलं तरी भारतासमोर त्यांनी विजयासाठी मोठं आव्हान ठेवलं आहे.
India vs New Zealand Pune Test
Team IndiaSakal
Updated on

India vs New Zealand 2nd Test at Pune: पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होत असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघासमोर न्यूझीलंडने धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२६ ऑक्टोबर) न्यूझीलंड संघ दुसऱ्या डावात ६९.४ षटकात २५५ धावांवर सर्वबाद झाला. परंतु, न्यूझीलंडने पहिल्या डावात १०३ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे न्यूझीलंडने भारतासमोर ३५९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

या सामन्यात तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ५ बाद १९८ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. सुरुवातीला टॉम ब्लंडेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी चांगली फलंदाजी केली होती. पण, भारताचा रविंद्र जडेजा चांगल्या लयीत गोलंदाजी करताना दिसला. यातच ब्लंडेल अडकला आणि ४१ धावांवर जडेजाविरुद्ध खेळताना त्रिफळाचीत झाला.

India vs New Zealand Pune Test
IND vs NZ 2nd Test : वॉशिंग्टन सुंदर आला धावून, पण टीम इंडियाचे फलंदाज गेले वाहून! न्यूझीलंडकडे मजबूत आघाडी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.