India vs New Zealand Pune Test: भारतीय क्रिकेट संघ सध्या मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहेत. बंगळुरूला झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता दुसरा सामना पुण्यात २४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघासमोर काही प्रश्न आहेत. तसेच या सामन्यापूर्वी भारतीय संघात अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश करण्यात आला आहे. यासर्व गोष्टींबाबत भारताचा सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोईशेट यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे.
वॉशिंग्टन सुंदरला संघात घेण्याबाबत रायन यांनी सांगितले, 'आमच्या संघात अक्षर पटेल आहे. डावखुऱ्या फलंदाजांपासून बॉल लांब ठेवणाऱ्या एका गोलंदाजांची आम्हाला गरज आहे. आम्हाला तो पर्याय हवा होता. त्याचबरोबर रणजी ट्रॉफीमधील कामगिरीचे फळ खेळाडूंना मिळत असल्याचा आनंद आहे.'