IND vs NZ: न्यूझीलंडविरूद्ध R Ashwin चा दबदबा; कसोटी क्रिकेटमध्ये ठरला 'येक नंबर'

IND vs NZ: न्यूझीलंडविरूद्ध भारत आज दुसरा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात भारतीय फिरकीपटू आर आश्विनला न्यूझीलंडचे ३ विकेट्स घेण्यात यश आले आहे.
r ashwin
r ashwinesakal
Updated on

R Ashwin Highest Wicket Taker in WTC: आज पुणे येथे भारत-न्यूझीलंडदरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फिरकीपटूंना मदत असणाऱ्या पुण्याच्या खेळपट्टीवर आर अश्विनने सकाळच्या सत्रात ३ विकेट्स पटाकावले. या तीन विकेटसह अश्विनने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठले आहे.

अश्विन ३९ सामन्यांमध्ये १८९ विकेट्स घेत यादित पहिल्या स्ठानी आहे. यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाच्या नेथन लायनला ( ४३ सामन्यांमध्ये १८७ विकेट्स) मागे टाकले. तर, ४२ सामन्यांमध्ये १७५ घेणारा पॅट कमिन्स यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

भारताने न्यूझीलंडविरूद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर, दुसऱ्या सामन्याला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आजपासून सुरूवात झाली. न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजीसाठी आला. पुण्यातल्या संथ खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळत होती. अशातच सकाळच्या सत्रात भातरतीय फिरकीपटू आर अश्विनने न्युझीलंडच्या दोन फलंदाजांना माघारी पाठले. ज्यामध्ये सलामीवीर टॉम लॅथमला स्थिरावण्याआधी १५ धावांवर माघारी पाठवले. तर त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विल यंगला १८ धांवर बाद करण्यात अश्विनला यश आले.

त्यानंतर न्यूझीलंडने चांगली खेळी केली. सलामीवीर डेव्होन कॉन्वे व रचिन रविंद्रच्या जोडीने ६२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर आश्विनने ४४ व्या षटकात माघारी पाठवले व सामन्यात तिसरी विकेट घेतली. डेव्होन कॉन्वे ११ चौकारांच्या मदतीने ७६ धावा करून माघारी परतला.

r ashwin
IND vs NZ, Pune Test: सर्फराज खान, विराट कोहली अन् इतरांनी रोहित शर्माला घेरलं, DRS घ्यायला लावला अन्...

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

अश्विनने आज १५०वा एलबीडब्लू विकेट घेतला. मुरलीधरननंतर (१६६) सर्वाधिक एलबीडब्लू विकेट घेणारा अश्विन दुसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने सर्व फॉरमॅटमध्ये आत्तापर्यंत ३०० बोल्ड + एलबीडब्लू विकेट्स घेतले आहेत. या यादित मुरलीधरनचे (३२६) विकेट्स आहेत. तर, जिमी अँडरसन (३२०) विकेट्स आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.