IND vs NZ: SuperWomen! राधा यादवचे दोन अफलातून कॅच पाहून तुम्हीही हेच म्हणाल; पोरीनं गाजवलंय मैदान, Video

Radha Yadav Catches: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताच्या राधा यादवच्या क्षेत्ररक्षणाने सर्वांनाच चकीत केले आहे. तिने या सामन्यांमध्ये घेतलेल्या झेलांचे व्हिडिओही बीसीसीआयने शेअर केले आहेत.
Radha Yadav | India vs New Zealand WOMEN
Radha Yadav | India vs New Zealand WOMENSakal
Updated on

India vs New Zealand Women ODI: न्यूझीलंड महिला संघही सध्या भारत दौऱ्यावर असून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहेत. या मालिकेतील दुसरा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असून यात राधा यादवच्या क्षेत्ररक्षणाने सर्वांनाच चकीत केले आहे.

तिने सुरूवतीपासूनच अफलातून क्षेत्ररक्षण या सामन्यात केलं. तिने या सामन्यात तीन महत्त्वाचे झेल घेतले, तिच्या या झेलांचा व्हिडिओही बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

न्यूझीलंडने या सामन्यात सुरुवात चांगली केली होती. जॉर्जिया प्लिमर आणि सुझी बेट्स यांनी ८७ धावांनी भागीदारी केली होती. अखेर ही भागीदारी प्लिमरला दीप्ती शर्माने बाद केले. पण तिच्या विकेटचे श्रेय दीप्तीबरोबरच राधा हिलाही जाते.

Radha Yadav | India vs New Zealand WOMEN
IND vs NZ 3rd Test : सरावाला 'दांडी', चालणार नाही! मालिका गमावल्यानंतर आली जाग, गौतम गंभीरला आलाय राग
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.