आत्मपरिक्षण करण्याची गरज....; भारताच्या न्यूझीलंडविरूद्ध ३-० अशा पराभवानंतर Sachin Tendulkar ने सुनावलं

IND vs AUS : न्यूझीलंडविरूद्ध मालिकेत एकतर्फी पराभवानंतर भारतीय संघ २२ नोव्हेंबरपासून ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
sachin tendulkar
sachin tendulkar esakal
Updated on

Sachin Tendulkar Reacts on IND vs NZ: भारताने मुंबईतील न्यूझीलंडविरूद्धचा अंतिम सामना २५ धावांनी गमावला. त्यामुळे भारताला मालिकेत ३-० ने पराभव पत्कारावा लागला. या पराभवामुळे तब्बल २४ वर्षांनी घरच्या मैदानावर पराभूत होण्याची भारतावर नामुष्की ओढवली. भारताच्या घरच्या मैदानावरील या लाजिरवाण्या पराभवानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय संघाला खडे बोल सुनावले.

सचिन ट्वीट करत म्हणाला, "घरच्या मैदानावर ३-० ने हार, हा पराभव पचवणे कठीण आहे आणि भारताला आत्मपरीक्षणाची गरज आहे. यात तयारीचा अभाव होता, शॉट्ची निवड खराब होती, की सामन्याचा सराव कमी पडला ?'

'शुभमन गिलने पहिल्या डावात चांगली कामगिरी केली आणि ऋषभ पंतने दोन्ही डावात उल्लेखनीय खेळ केला. त्याच्या फूटवर्कमुळे एक आव्हानात्मक सामना सोपा वाटू लागला होता. तो उत्कृष्ट खेळला.'

'संपूर्ण मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरीचे संपूर्ण श्रेय न्यूझीलंडला जाते. भारतामध्ये ३-० असा विजय, हा नक्कीच चांगला निकाल आहे."

भारताला तीन किंवा तीन पेक्षा जास्त सामन्यांच्या मालिकेत घरच्या मैदानावर व्हाईट वॉश करणारा न्यूझीलंड पहिला संघ ठरला. याआधी २००० मध्ये सचिन तेंडूलकरच्या नेतृत्वाखाली भारताला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दोन कसोटी सामन्यात पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर आता २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला व्हाईट वॉशला सामोरे जावे लागत आहे.

कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

भारताने न्यूझीलंडविरूद्धचा सामना ३-० ने गमावल्यामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला आणखी महत्व प्राप्त झाले आहे. भारतीय संघ आत्तापर्यंत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी होता. पण, या पराभवानंतर भारतीय संघ दुसऱ्या स्थानी घसरला आहे व दुस्ऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाने क्रमतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. त्यामुळे दोन्ही संघात WTC स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यासाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. भारताला अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ५ सामन्यांपैकी ४ सामने जिंकावे लागतील. तर ऑस्ट्रेलियाला ७ कसोटी सामने खेळायचे आहेत आणि त्यापैकी ४ सामने जिंकावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.