IND vs NZ: विराटच्या खेळीवर संजय मांजरेकर नाराज; म्हणाले कारकीर्दितील सर्वात खराब शॉट

IND vs NZ 2nd Test at Pune: दुसऱ्या कसोटीत भारताचा डाव न्यूझीलंडने १५६ धावांवर आटपला आणि सामन्यात १०३ धावांची आघाडी घेतली.
IND vs NZ
India vs New Zealandesakal
Updated on

IND vs NZ 2nd Test at Pune: भारत-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना पुणे येथे सुरू आहे. न्यूझीलंडचा पहिला डाव भारताने २५९ धावांवर आटपला. पहिला दिवस भारताच्या वॉशिंग्टन सुंदरने ७ विकेट घेत गाजवला. तर, दुसऱ्या दिवसात न्यूझीलंडच्या मिचेल सॅंटनरने भारताचे सात विकेट घेत वर्चस्व दाखवले. त्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहलीलाही 'बोल्ड' करून माघारी पाठवले. विराट केवळ एक धाव करून माघारी परतला. यावर भारतीय माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी निराशा व्यक्त केली.

संजय मांजरेकर ट्विट करत म्हणाले, "विराटला माहित आहे की, त्याने हा त्याच्या आयुष्यातील सर्वात खराब फटका खेळला आहे. त्याच्याबद्दल वाईट वाटले, कारण तो नेहमीच चांगल्या हेतूने फलंदाजीसाठी उतरतो."

पहिल्या दिवसातील शेवटच्या सत्रात भारताने फलंदाजीला सुरूवात केली. कालच्या दिवसात भारताने १६ धावा करत १ विकेट गमावला होता. त्यानंतर यशस्वी जैस्वाल व शुभमन गिलच्या जोडीने दुसऱ्या दिवसाची चांगली सुरूवात केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. पण भारताचे अर्धशतक पुर्ण होताच शुभमन गिल (३०) बाद झाला आणि लगेचच विराटनेही (१) विकेट टाकली.

IND vs NZ
IND vs NZ 2nd Test : ७ बाद १०३ धावा! Yashasvi Jaiswal ने इतिहास रचला, पण विराटसह इतरांनी पार केला कचरा

भारताचा घसरता डाव कोणत्याही फलंदाजाला सावरता आला नाही. रविंद्र जडेजाने ३ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३८ धावा केल्या. पण त्यालाही यश आले नाही. मध्यंतरापूर्वी भारताचा डाव १५६ धावांवर संपुष्टात आला आणि न्यूझीलंडने सामन्यात १०३ धावांची आघाडी घेतली. भारताला रोखण्यात मिचेल सॅंटनरला यश आले. त्याने सामन्यात ७ विकेट्स घेतल्या. तर त्याला ग्लेन फिलिप्स (२) व टीम साऊदीची (१) साथ मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.