IND vs NZ 3rd Test: आता लक्ष्य मुंबईच्या खेळपट्टीकडे; भारतासमोर व्हाईटवॉश टाळण्याचे आव्हान

India vs New Zealand 3rd Test: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळायचा आहे. या सामन्यात व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान भारतासमोर असणार आहे.
India vs New Zealand Test
India vs New Zealand TestSakal
Updated on

India vs New Zealand Mumbai Test: बंगळूर कसोटीत पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज ढेपाळले. त्यानंतर पुण्यातील फिरकी गोलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर मिचेल सँटनरच्या प्रभावी गोलंदाजीपुढे पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांकडून निराशा झाली.

आता मुंबईत दोन देशांमध्ये १ नोव्हेंबरपासून तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. या कसोटीतील खेळपट्टीकडे लक्ष असणार आहे. कसोटी मालिका गमावण्याची आपत्ती टीम इंडियावर कोसळली आहे. आता मायदेशात व्हाईटवॉशची नामुष्की ओढवण्याचे संकट रोहित शर्माच्या ब्रिगेडवर घोंघावत आहे. यामधून भारतीय संघ बाहेर येतो का, याचे उत्तर आगामी काळात मिळेल.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी ही नेहमी फलंदाजी व गोलंदाजी अशी दोन्हीला मदत करणारी म्हणून ओळखली जाते. या स्टेडियमच्या खेळपट्टीवर लाल मातीचा थर असतो. येथे चेंडूला उसळी मिळते. तसेच, चेंडूला फिरकही मिळते.

वेगवान गोलंदाजांसह फिरकी गोलंदाजांनाही येथे मदत मिळते. शिवाय, वानखेडे स्टेडियमच्या आऊटफिल्डवर चेंडू वेगवान जात असल्यामुळे फलंदाजांना धावाही करण्यास मदत होते. धावांचा पाऊसही येथे पडतो.

India vs New Zealand Test
IND vs NZ: तिथं आमचं चुकलंच...! टीम इंडिया का हरली पुणे कसोटी? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.