IND vs NZ 1st Test: भारतविरूद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना आज चौथ्या दिवशी पावसामुळे रोखण्यात आला होता. भारत दुसऱ्या डावात तीन विकेट्स गमावून ३९६ धावांवर खेळत आहे. सर्फराज खानने सामन्यात शतक झळकावून १४४ धावांवर नाबाद आहे. ऋषभ पंत अर्धशतक करत ८५ धावांवर खेळत आहे. सामना थांबल्यानंतर चाहत्यांसोबत रोहितचा आणखी एक विनोदी किस्सा घडला आहे.
आयपीएल २०२५ हंगामाबाबत रिटेंशन तारिख जवळ येत असली तरीही मुंबई इंडियन्स संघाने संघात कायम राहणाऱ्या खेळाडूंबद्दल अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे रोहित शर्मा मुंबई संघात कायम राहणार की नाही याबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. बंगळूरू येथे सुरु असणाऱ्या न्यूझीलंडविरूद्धचा कसोटी सामना पावसामुळे थांबल्यानंतर रोहित शर्माला मैदानाबाहेर एका चाहत्याने आयपीएल २०२५ संघाबाबत प्रश्न विचारला. त्यावर रोहितने त्यावर मिश्किल उत्तर दिले आहे. बंगळूरू मधल्या या चाहत्याने रोहितला आयपीएल २०२५ साठी आरसीबी संघामध्ये येण्याची विनंती केली.
चाहत्याने रोहितला विचारले, " रोहित भाई आयपीएल मध्ये कोणता संघ ?" त्यावर रोहितने उत्तर दिले " तुला काणता संघ पहिजे सांग?" त्यानंतर चाहत्याने त्याला आयपीएल २०२५ हंगामासाठी आरसीबी संघामध्ये येण्याची विनंती केली.
सध्या भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरूद्ध पहिला कसोटी सामना खेळत आहे. सामन्याला न्यूझीलंडने धमाकेदार सुरूवात केली. न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव ४६ धावांवर गुंडाळूला व भारताविरूद्ध धमाकेदार फलंदाची करून ४०२ धावा उभारल्या. सामन्यात न्युझीलंडने ३५६ धवांची आघाडी घेतली असताना भारत तिसऱ्या दिवशी दुसरा डाव खेळण्यास उतरला आणि पिछाडीवर असलेल्या भारताने सामन्यात पुनरागमन करण्यास सुरूवीत केली.