IND vs NZ: काल अ‍ॅक्टींग करत मैदान गाजवले, आज ९व्या चेंडूवर त्रिफळे उडाले! Virat Kohli चे दोन भिन्न Video

Virat Kohli Viral Video: पुण्यात सुरू असलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्याच्या कसोटीत भारताचा विराट कोहलीने त्याच्या अ‍ॅक्टींगने लक्ष वेधलं होतं. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याला फलंदाजीत खास काही करता आले नाही.
IND vs NZ
Virat Kohli Viral VideoSakal
Updated on

India vs New Zealand Pune Test: भारतीय संघ गुरुवारपासून (२४ ऑक्टोबर) न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळत आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना सुरू असून दोन्ही संघात चूरस दिसून येत आहे. दरम्यान, या सामन्यातील विराट कोहलीचे दोन व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.

विराटची मैदानातील अ‍ॅक्टींग

विराट अनेकदा सामन्यांदरम्यान मैदानाच मजेशीर गोष्टी करत असतो. कधी तो डान्स करताना दिसतो, तर कधी विचित्र कृतीकरून चाहत्यांचे मनोरंजन करतो. असाच प्रकार पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशीही दिसला.

गुरुवारी तो फलंदाजी आलेली नसतानाही पॅड वैगरे बांधून बॅट घेऊन मैदानात मस्ती करण्यासाठी आला होता. यावेळी तो अ‍ॅक्टींग करतानाही दिसला. चाहत्यांच्या मते तो शुभमन गिलची अ‍ॅक्टींग करत होता. त्याच्या अ‍ॅक्टींगने न्यूझीलंड खेळाडूंचेही लक्ष वेधले होते, या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

IND vs NZ
IND vs NZ 2nd Test : अरे, नेट बॉलरही त्रिफळा उडवतोय! Virat Kohli ची विकेट पाहून चाहते चिंतित, Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.