Chef or Captain SuryaKumar Yadav: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आजपासून चार सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे दुसऱ्या फळीतील खेळाडूंना आपली चमक दाखवण्याची ही सुवर्णसंधी लाभणार आहे. रिंकू सिंग, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा व तिलक वर्मा या खेळाडूंसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्याचवेळी कर्णधार सूर्यकुमार यादव याने दोन नव्या खेळाडूंची भन्नाटी स्टाईलमध्ये ओळख करून दिली आहे. गोलंदाज वैशाक विजयकुमार व फलंदाज रमणदीप सिंग यांची ओळख करून देताना सूर्याने 'आचारी' अर्थात Chef च्या शैलीची मदत घेतली. बीसीसीआयने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.