IND vs SL 2nd ODI: वेल्लालागे पुन्हा नडला अन् श्रीलंकेच्या शेपटानं घाम फोडला! भारतासमोर विजयासाठी २४१ धावांचं लक्ष्य

India vs Sri Lanka 2nd ODI 1st Innings: दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी २४१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Team India | Sri Lanka vs India 2nd ODI
Team India | Sri Lanka vs India 2nd ODIX/BCCI
Updated on

India vs Sri Lanka 2nd ODI Match: कोलंबोमध्ये रविवारी (४ ऑगस्ट) श्रीलंका विरुद्ध भारत संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर २४१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

या सामन्यात श्रीलंकने ५० षटकात ९ बाद २४० धावा केल्या. श्रीलंकेकडून तळातल्या फलंदाजांनी मोलाचं योगदान दिलं. त्यामुळे त्यांना २०० धावांचा टप्पा ओलांडता आला.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर फॉर्ममध्ये असलेल्या पाथम निसंकाला मोहम्मद सिराजने बाद केले. त्याचा झेल यष्टीरक्षक केएल राहुलने पकडला. पण त्यानंतर अविष्का फर्नांडो आणि कुशल मेंडिस यांनी संयमी खेळ करत डाव सावरला आणि अर्धशतकी भागीदारी केली.

Team India | Sri Lanka vs India 2nd ODI
IND vs SL, ODI: What, You tell me! माझ्याकडे काय पाहातोस? रोहित शर्माचा मजेशीर Video पाहिलात का?

अविष्का फर्नांडो आणि कुशल मेंडिस यांची भागीदारी रंगत असतानाच मधल्या षटकांमध्ये रोहितने फिरकीपटूंचा गोलंदाजीची संधी दिली. यावेळी वॉशिंग्टन सुंदरने आपल्या फिरकीने श्रीलंकेच्या फलंदाजांना त्रस्त केले.

त्याने १७ व्या षटकात अविष्का फर्नांडोला ४० धावांवर आपल्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले. त्यानंतर १९ व्या षटकात कुशल मेंडिसला ३० धावांवर पायचीत केले.

त्यानंतरही सदिरा समरविक्रमा आणि कर्णधार चरिथ असलंका यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षर पटेलने समरविक्रमाला २७ व्या षटकात विराट कोहलीच्या हातून झेलबाद करत १४ धावांवर माघारी धाडले.

३४ व्या षटकात जमिथ लियानागेला १२ धावांवर कुलदीप यादवने आपल्याच चेंडूवर झेल घेत बाद केले, तर पुढच्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरने श्रीलंकेाचा कर्णधार चरिथ असलंकाला बाद केले. त्याचा झेल २५ धावांवर अक्षर पटेलने घेतला. त्यामुळे एका क्षणी श्रीलंका ६ बाद १३६ धावा अशा कठीण परिस्थितीत अडकले होते.

Team India | Sri Lanka vs India 2nd ODI
IND vs SL, 2nd ODI: श्रीलंकेने जिंकला टॉस! भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाकोणाला मिळाली संधी?

मात्र यानंतरही पुन्हा एकदा दुनिथ वेल्लालागे श्रीलंकेच्या मदतीला धावून आला. पहिल्या सामन्यात अर्धशतक केलेल्या वेल्लालागेने या सामन्यातही शानदार खेळी केली. त्याने आधी कामिंदू मेंडिसला साथीला घेतले. त्यांनी सातव्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली आणि श्रीलंकेला २०० धावांचा टप्पा पार करून दिला.

त्यांना बाद करण्याचा प्रयत्न भारताच्या गोलंदाजांकडून अनेकदा झाला. अखेर वेल्लालागेला ४७ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कुलदीप यादवने बाद केले. त्याचा शानदार झेल शिवम दुबेने घेतला. वेल्लालागेने ३५ चेंडूत ३९ धावा केल्या.

तो बाद झाल्यानंतरही कामिंदू मेंडिस आणि अकिला धनंजया यांनी काही आक्रमक शॉट्स खेळत श्रींलेकेचा डाव पुढे नेला. त्यांनी अखेरीस ३१ धावांची भागीदारी केली. पण दोघेही शेवटच्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर धावबाद झाले.

मेंडिसला श्रेयस अय्यरने अफलातून थ्रो करत धावबाद केले. तर धनंजयाला विराट कोहली आणि रोहित शर्माने मिळून धावबाद केले. पण श्रीलंकेच्या तळातील फलंदाजांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना २४० धावांपर्यंत पोहचता आले.

भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने ३ विकेट्स घेतले, तर कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.