Rohit Sharma : टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीवर रोहित संतापला, पराभवासाठी 'या' फलंदाजांना धरले जबाबदार

श्रीलंकेकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा नाराज...
IND vs SL 2nd odi Rohit Sharma Statement
IND vs SL 2nd odi Rohit Sharma Statementsakal
Updated on

Rohit Sharma Statement : रोहित शर्माचा अपवाद वगळता भरवशाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. त्यामुळे भारताला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मालिकेत ०-१ असे पिछाडीवर पडण्याची वेळ आली.

भारतीय गोलंदाजही पकड कायम राखण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरले. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने ६ बाद १३६ वरून २४० पर्यंत मजल मारली. या आव्हानासमोर रोहित शर्माने ४४ चेंडूत ६४ धावांचा तडाखा दिला. त्यामुळे भारताने बिनबाद ९७ अशी सुरुवात केली, मात्र त्यानंतर भारताने ५० धावांत सहा फलंदाज गमावले तेथेच सामना हातून निसटला.

IND vs SL 2nd odi Rohit Sharma Statement
Paris Olympic 2024, Day 10: लक्ष्य सेन ब्राँझ मेडल मिळवणार? महाराष्ट्राचा अविनाश साबळेही उतरणार मैदानात, पाहा आजचं वेळापत्रक

दुसऱ्या वनडेतील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, 'जेव्हा तुम्ही सामना गमावता तेव्हा सर्व काही दुखावते. हे फक्त त्या 10 षटकांबद्दल नाही. तुम्हाला सातत्यपूर्ण क्रिकेट खेळावे लागेल आणि आम्ही आज ते करू शकलो नाही. मी थोडे दु:खी आहे पण अशा गोष्टी घडतात. आता समोर जे काही आहे ते स्वीकारावे लागेल.

रोहित पुढे म्हणाला की, "माझ्या 65 धावा करण्यामागचे कारण म्हणजे माझी फलंदाजीची शैली. जेव्हा मी अशी फलंदाजी करतो तेव्हा मला खूप जोखीम पत्करावी लागते. मला माझ्या हेतूंशी तडजोड करायची नाही, मधल्या षटकांमध्ये हे खरोखर कठीण होते, आम्हाला जास्तीत जास्त लक्ष्य मिळविण्याचा प्रयत्न करावा लागेल. आम्ही कसे खेळलो यावर जास्त लक्ष केंद्रित करू इच्छित नाही. मधल्या षटकांमध्ये आमच्या फलंदाजीबद्दल आता चर्चा होईल.

IND vs SL 2nd odi Rohit Sharma Statement
Paris Olympic 2024: हॉकी संघाची शूटआऊटमध्ये बाजी, पण लक्ष्य सेन अन् लवलिना बोर्गोहेनला पदरी निराशा; भारतासाठी कसा होता नववा दिवस?

बरोबरीत सुटलेल्या पहिल्या सामन्यातही जवळपास असेच चित्र होते, मात्र त्या सामन्यातील अनुभवानंतर भारतीयांनी आज सुधारणा केली नाही. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजीचा चक्रव्यूह भारतीय फलंदाजांना भेदता आला नाही. जेफ्री वांदरसे याने सहा विकेट मिळवून भारतीय फलंदाजीची दैना केली.

विराट कोहली (१४), शिवम दुबे (०), श्रेयस अय्यर (७) आणि केएल राहुल (०) हे सर्व फलंदाज वांदरसे याचे बळी ठरले. अक्षर पटेलने ४४ धावांची खेळी करून लढा कायम ठेवला होता, पण तो बाद झाल्यावर पराभव निश्चित झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.