India vs Sri Lanka, 3rd ODI: श्रीलंका विरुद्ध भारत संघात तिसरा आणि अखेरचा वनडे सामना बुधवारी खेळवला जात आहे. कोलंबोला होत असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. ऋषभ पंत आणि रियान पराग यांना केएल राहुल आणि अर्शदीप सिंग यांच्याजागेवर संधी देण्यात आली आहे.
परागचे हे वनडे पदार्पण आहे. त्याला त्याच्या पदार्पणाची कॅप विराट कोहलीच्या हस्ते देण्यात आली. तो भारताकडून पदार्पण करणारा २५६ वा खेळाडू ठरला. त्याने यापूर्वी गेल्या महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यातील टी२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
याशिवाय ऋषभ पंतचेही वनडेमध्ये तब्बल २१ महिन्यांनंतर पुनरागमन झाले आहे. त्याने अखेरचा वनडे सामना ३० नोव्हेंबर २०२२ रोजी खेळला होता.
दरम्यान श्रीलंकेनेही प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. श्रीलंकेने प्लेइंग इलेव्हनमध्ये अकिला धनंजयाच्या जागेवर महिशा तिक्षणाला संधी देण्यात आली आहे.
हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या दोन्ही संघातील पहिला सामना बरोबरीत सुटला होता, तर दुसरा सामना श्रीलंकेने जिंकला होता. त्यामुळे जर तिसरा सामना आता श्रीलंकेने जिंकला, तर ते ही मालिकाही जिंकतील. मात्र, जर भारताने विजय मिळवला तर मालिकेत १-१ अशी बरोबरी होईल.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
श्रीलंका: पाथम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, कामिंडू मेंडिस, दुनिथ वेल्लालागे, महेश तिक्षणा, जेफ्री वाँडरसे, असिथा फर्नांडो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.