IND vs SL 1st ODI Live : भारतीय गोलंदाजांचा अचूक मारा, निसंका-वेल्लालागेची झुंज, तरी श्रीलंका दोनशेपार

IND vs SL 1st ODI match, 1st Innings: पहिल्या वनडेत भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा करत श्रीलंकेला २०० धावा करण्यासाठीही संघर्ष करायला लावला.
India Cricket Team
India Cricket TeamSakal
Updated on

India vs Sri Lanka 1st ODI Live Update : ट्वेंटी-२० मालिकेतील अपयशाचा कित्ता श्रीलंकंनेने वन डे मालिकेतील पहिल्या लढतीत गिरवला. कर्णधार रोहित शर्माने आजच्या (2 ऑगस्ट) सामन्यात शिवम दुबेला संधी देऊन सर्वांना आश्चर्यचकीत केले.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताने श्रीलंकेला ५० षटकात ८ बाद २३० धावांवर रोखले. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य असेल.

या सामन्यात मोहम्मद सिराजने तिसऱ्या षटकात अविष्का फर्नांडो ( १) याला माघारी पाठवले. त्यानंतर शिवम दुबेने त्याच्या पहिल्याच षटकात कुसल मेंडिसला ( १४) पायचीत केले. रोहितने श्रीलंकेच्या फलंदाजांभवती फिरकीचे जाळे विणायला सुरुवात केली.

अक्षर पटेल, कुलदीप यादव व वॉशिंग्टन सुंदर यांच्या फिरकीसमोर लंकन गोलंदाज गोंधळले. त्याचाच फायदा घेताना अक्षरने १९व्या षटकात सदीरा समरविक्रमाला ( ८) झेलबाद करून माघारी पाठवले.

India Cricket Team
IND vs SL ODI: IPL वाला रूल है क्या! अम्पायरने वाईड देताच, भारतीय खेळाडूंचा एकमेकांशी संवाद Video Viral

सलामीवीर पथुम निसंका आणि कर्णधार चरिथ असलंका यांनी थोडावेळ संघर्ष केला. पण, कुलदीप यादवने २४व्या षटकात असलंकाला ( १४) माघारी पाठवले. पण, यानंतर वॉशिंग्टनने सर्वात मोठा धक्का दिला. ७५ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने ५६ धावांची खेळी करणाऱ्या निसंकाला २७व्या षटकात माघारी पाठवून वॉशिने श्रीलंकेची अवस्था ५ बाद १०१ अशी केली.

शुभमनची बॉलिंग अन् १४ धावा...

सामन्यावर मजबूत पकड घेतल्यानंतर रोहितने ३२व्या षटकात शुभमन गिलला गोलंदाजीला आणले आणले आणि श्रीलंकेच्या फलंदाजांना सूर शोधण्याची संधी मिळाली. दुनिथ वेल्लालागेने त्या षटकात १४ धावा कुटल्या.

दुनिथ व जनिथ लियानागे ही जोडी भारताचं टेंशन वाढताना दिसली. पण, अक्षरने ही जोडी तोडली. जनिथला ( २०) त्याने रोहितच्या हाती झेल देऊन माघारी पाठवले. पण, रिप्लेत जनिथच्या बॅटचा चेंडूशी संपर्क झाला नसल्याचे दिसताच श्रीलंकन डग आऊटमधून आश्चर्य व्यक्त केले गेले.

India Cricket Team
IND vs SL 1st ODI Live : १६९१ दिवसानंतर पहिली विकेट; रोहितच्या 'लाडक्या'ने संधीचं केलं सोनं

यानंतर वनिंदू हसरंगा आणि दुनिथ यांनी श्रीलंकेचा डाव सावरला. पण त्यांची जोडी भारतीय संघाला त्रास देतेय असं वाटत असतानाच अर्शदीप सिंगने ४२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेलच्या हातून हसरंगाला २४ धावांवर बाद केले.

तरी एका बाजूने दुनिथ झुंज देत होता. त्याने अर्धशतक करत श्रीलंकेला २०० धावांचा टप्पा पार करून दिला. त्याला नंतर अकिला धनंजयने साथ दिलेली. पण तो अखेरच्या षटकात १७ धावा करून बाद झाला. अखेरीस दुनिथ ६५ चेंडूत ६७ धावांवर नाबाद राहिला.

भारताकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज, शिवम दुबे, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.