India vs Sri Lanka 3rd T20I Surya blunder - सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर यांच्या नव्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिकेत श्रीलंकेवर ३-० असा दणदणती विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा प्रयोग मुख्य प्रशिक्षक गौतमने केला आणि तो फसतोय की काय, असे वाटत होते. पण, सूर्या आणि रिंकू सिंग यांनी शेवटच्या दोन षटकांत मॅच फिरवली अन् Super Over मध्ये मॅच गेली. भारताने हा सामना जिंकून मालिका ३-० अशी खिशात टाकली. पण, या सामन्यात सूर्याकडून २०व्या षटकात मोठी चूक झाली आणि त्यावर कॅप्टनलाच विश्वास बसला नाही.
मालिकेतील पहिल्या ट्वेंटी-२० सामन्याप्रमाणे कालही श्रीलंकेच्या फलंदाजांनी निराश केले. खलिल अहमदने टाकलेल्या १८व्या षटकात १२ धावा मिळूनही त्यांना सामना जिंकता आला नाही. शेवटच्या २ षटकांत त्यांना ९ धावाही नाही करता आल्या. रिंकू सिंग व सूर्यकुमार यादव यांनी ही दोन षटकं टाकली आणि सामना बरोबरीत सोडवला. पण, हा सामना सुपर ओव्हरमध्ये जाण्यापासून वाचवता आला असता, जर सूर्यकुमार यादवकडून चूक झाली नसती.
शेवटच्या षटकात भारताला ६ धावांचा बचाव करायचा होता आणि सूर्याने सलग दोन चेंडूंत विकेट्स घेतल्या. असिथा फर्नांडोने हॅटट्रिक होऊ दिली नाही. शेवटच्या दोन चेंडूंवर पाच धावा हव्या असताना चमिंदू विक्रमासिंघेने बॅकफूटवर येऊन चेंडू लाँग ऑफच्या दिशेने ढकलला आणि दोन धावांसाठी तो पळाला. रियान परागने तो चेंडू त्वरित सूर्याकडे फेकला आणि त्याला नॉन स्ट्रायकर एंडला श्रीलंकेच्या फलंदाजाला रन आऊट करता आले असते. पण, त्याने चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकला आणि साराच गोंधळ झाला.
आपल्याकडून काहीतरी चुकलंय हे कळताच सूर्यकुमार आधी गोंधळला आणि स्वतःच्याच कृतीवर त्याला विश्वास बसेनासा झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.