IND vs SL : गौतम गंभीरला ट्वेंटी-२० संघात Mumbai Indians चा 'हा' खेळाडू हवा होता, पण...

India vs Sri Lanka T20I - रियान पराग याची वन डे संघात निवड का झाली, यामागचं कारणही समोर आले आहे. ऋतुराज गायकवाड व अभिषेक शर्मा यांना स्थान का नाही मिळाले, हेही समजले.
gautam gambhir riyan parag tilak verma
gautam gambhir riyan parag tilak vermasakal
Updated on

India's squads for the Sri Lanka tour - श्रीलंका दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात बरेच बदल पाहायला मिळाले.. त्यापैकी एक म्हणजे सूर्यकुमार यादव याची कर्णधारपदी झालेली अनपेक्षित निवड... हार्दिक पांड्या या शर्यतीत आघाडीवर होता, परंतु त्याचे दुखापतग्रस्त असणे हे कारण त्याच्या कर्णधारपदाच्या मार्गात आडवे आहे. नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनाखालील हा भारताचा पहिलाच दौरा आहे.

या दौऱ्यासाठीच्या वन डे संघात रियान पराग याची झालेली निवड सर्वांना आश्चर्यचकित करणारी ठरत आहे. आसामच्या या फलंदाजाने झिम्बाब्वे दौऱ्यातून त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले. पाच सामन्यांत फक्त दोनवेळाच फलंदाजी करायला त्याला मिळाली. त्यानंतर त्याने ट्वेंटी-२० संघात स्थान कायम राखले आणि वन डे संघात पदार्पणाची संधी मिळाली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर ऋतुराज गायकवाड व अभिषेक शर्मा या दोघांनी दमदार कामगिरी करूनही त्यांना वगळून रियानची निवड केल्याने सर्वांना आश्चर्य वाटले.

gautam gambhir riyan parag tilak verma
IND vs SL: मोठी बातमी! श्रीलंकेच्या प्रमुख गोलंदाजाचं बोट मोडलं, भारताविरुद्धच्या मालिकेतून घेतली माघार

पण, टाईम्स ऑफ इंडियाने रियानची निवड का केली या मागचं कारण सांगितले. रिपोर्टनुसार तिलक वर्मा याची दुखापत ही रियानच्या पथ्यावर पडली. मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवसोबत खेळणारा तिलक हा गौतम गंभीर व निवड समितीची पहिली पसंती होता. मागील तीन वर्षांत त्याने सातत्यपूर्ण कामगिरीही केली होती, परंतु दुखापतीमुळे त्याची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली नाही.

''रियान पराग हा प्रतिभावान खेळाडू आहे आणि त्याने त्याच्या खेळात प्रचंड सुधारणा करून दाखवली आहे. खेळपट्टीवर केव्हा जम बसवून उभं राहायचं हे त्याला माहित आहे. त्याशिवाय तो गोलंदाजीही करतो आणि क्षेत्ररक्षणातही चपळ आहे. निवड समितीला भविष्यासाठी त्याला तयार करायचे आहे आणि त्यासाठी त्याला संधी द्यायची आहे,''असे सूत्रांनी या वृत्तपत्राला सांगितले.

gautam gambhir riyan parag tilak verma
IND vs SL Special Jersey: भारतीय संघाचे वाढले 'Star'! नवी जर्सी पाहून वाटेल अभिमान Video

''तो यॉर्कर, स्लोव्हर चेंडू टाकू शकतो आणि त्याच्याकडे विविध प्रकारे गोलंदाजी करण्याचे कौशल्य आहे. त्यामुळेच मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी तो योग्य पर्याय ठरतो,''असेही सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.