India tour Sri Lanka Hardik-Abhishek Argument: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघाला पुन्हा अॅक्शनमोड मध्ये पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली आहे. २७ जुलैपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याच्या मार्गदर्शनाखाली हा भारताचा पहिला दौरा आहे आणि सूर्यकुमार यादव हा नवीन कर्णधार म्हणून या मालिकेत उतरणार आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद जाईल असे सर्वांना वाटले होते. पण, गौतम व अजित आगरकर यांनी सूर्याला पसंती दिली. त्याचवेळी हार्दिककडून उप कर्णधारपद काढून ते शुभमन गिलकडे दिले गेले. त्यामुळे हार्दिक नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. पण, मुंबई विमानतळावर सूर्याला मिठी मारून हार्दिकने नाराजीच्या बातम्यांचा फुगा फोडला. पण, टीम इंडियाच्या पहिल्या सराव सत्रात हार्दिक आणि सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर ( Abhishek Nayar) यांच्याशी हुज्जत घालताना दिसला. हा वाद सोडवण्यासाठी पत्रकाराची मदत घेतली गेली.
अभिषेक नायर हा या दौऱ्यावर भारतीय संघाचा नवा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून गेला आहे. त्याची आणि हार्दिकची चौकारावरून हुज्जत झाल्याचे पाहायला मिळाले. फलंदाजीचा सराव करत असताना हार्दिकने पॉईंटच्या दिशेने चेंडू टोलवला आणि तो चौकार असल्याची मागणी त्याने अभिषेक नायरकडे केले. पण, नायरने ती मागणी मान्य केली नाही.
हार्दिक व नायर यांच्यात यावरून हुज्जत सुरू झाली. त्याचवेळी नायर तिथे उपस्थित असलेल्या पत्रकाराकडे गेला आणि त्याला त्याने विचारले. पत्रकारानेही तो चौकार असल्याचे सांगितले आणि त्यानंतर हार्दिक व नायर खळखळून हसले.
सराव सत्रात हार्दिकने ४० मिनिटे शुभमन गिल व यशस्वी जैस्वाल या सलामीवीरांना गोलंदाजीही केली. या दोघांनी सराव सत्रात आक्रमक केळी केली. भारतीय संघाचे सराव सत्र तीन तास चालले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.