Gautam Gambhir Press Conference Live: गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया नवीन सुरुवात करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तून निवृत्ती जाहीर केली. या स्टार खेळाडूंची जागा भरून काढण्याचं आव्हान गौतमसमोर आहेच. त्यात त्याने सूर्यकुमार यादवकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली होती आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनलही खेळली होती. त्यामुळे ही दमदार कामगिरी कायम राखण्याचं आव्हान गौतम गंभीरसमोर आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाचा हा पहिलाच दौरा आहे आणि त्याआधी त्याने त्याच्या जबाबदारीबाबत मोठं विधान केलं.
तो म्हणाला,"माझ्या दृष्टिकोनातून, हे अगदी सोपे आहे, मी लोकांना स्वातंत्र्य देण्यावर विश्वास ठेवतो. मला मुख्य प्रशिक्षक आणि खेळाडू असे नाते नकोय.. सर्वोत्तम नाते हे विश्वासावर टिकून असते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला नेहमी आनंदी आणि सुरक्षित ड्रेसिंग रूम हवा आहे. आम्हाला गोष्टी किचकट करायच्या नाहीत. मी खूप यशस्वी संघाची जबाबदारी स्वीकारली आहे. संघातील काही प्रमुख खेळाडूंनी निवृत्ती घेतल्याने, रिक्त झालेली पोकळी भरून काढायची आहे. मी पुढील आव्हानासाठी सज्ज आहे.''
"माझे जय शाह यांच्याशी खूप चांगले नाते आहे, ते खूप पूर्वीपासून आहे. ते खूप चांगले नाते आहे, आशा आहे की ते असेच पुढे चालू राहिल. भारतीय क्रिकेटचा विकास अधिक महत्त्वाचा आहे, गौतम गंभीरचा नाही. आपल्या सर्वांचे योगदान हवे आहे. आत्तापर्यंत त्यांच्यासोबत काम करण्याचा आनंद लुटला आहे, आशा आहे की भविष्यातही ते असेच चालू राहील,” असे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने म्हटले. या विधानावरून त्याला नेमकं काय सूचवायचंय याचा अंदाज बांधणे अवघड आहे.
''श्रीलंका दौऱ्यानंतर खूप मोठा ब्रेक आम्हाला मिळणार आहे आणि त्यानंतर आम्हाला १० कसोटी सामने खेळायचे आहे. हे आमच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे. या १० कसोटींमध्ये चांगली कामगिरी करू अशी आम्हाला आशा आहे. रवींद्र जडेजा या त्या १० कसोटीसाठी आमच्यासाठी महत्त्वाचा आहे,''असे गंभीरने म्हटले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.