IND vs SL : संपूर्ण सिरिजमध्ये फ्लॉप तरी गंभीरच्या लाडक्या शिष्याने जिंकलं मेडल! काय घडलं नेमकं?

Ind vs SL Series: गेल्या वर्षी एकदिवसीय वर्ल्ड कपदरम्यान भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी एक विशेष पुरस्कार देण्यासाठी सुरुवात केली.
Gautam Gambhir Ind vs Sa
Gautam Gambhir Ind vs SLsakal
Updated on

Ind vs SL : गेल्या वर्षी एकदिवसीय वर्ल्ड कपदरम्यान भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी एक विशेष पुरस्कार देण्यासाठी सुरुवात केली. ज्या अंतर्गत प्रत्येक सामन्यानंतर टीम इंडियासाठी जो कोणी चमकदार कामगिरी करत होता त्या खेळाडूला एक मेडल दिले जात होते.

Gautam Gambhir Ind vs Sa
Ashwini Ponnappa Retirement : "माझी शेवटची...", पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलग तीन पराभवानंतर भारतीय खेळाडूची निवृत्तीची घोषणा

पण आता हे मेडल द्विपक्षीय मालिका संपल्यानंतर दिले जाते आणि असेच दृश्य श्रीलंकेतही पाहायला मिळाले. श्रीलंका दौऱ्यावरील टी-20 मालिका 30 जुलै रोजी संपली, ज्याचा अंतिम सामना सुपर ओव्हरमध्ये झाला आणि टीम इंडियाने 3-0 ने मालिका जिंकली. मालिका संपल्यानंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या नावाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे संपूर्ण सिरिजमध्ये फ्लॉप असलेल्या खेळाडूला आणि गंभीरच्या लाडक्या शिष्याने मेडल जिंकलं आहे.

Gautam Gambhir Ind vs Sa
Paris Olympic 2024 : मनूचा ‘वन वुमन शो’ अन् सरबज्योतची अखेरच्या क्षणी चमक; ऐतिहासिक पदकाचा 'लक्ष्य'भेदी थरार

श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताचा वेगवान फलंदाज रिंकू सिंगची बॅटसह कामगिरी अत्यंत खराब होती. पहिल्या सामन्यात त्याने फक्त एक धावा केली, तर दुसऱ्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही, तर तिसऱ्या सामन्यात पण तो केवळ एक रन करून आऊट झाला. पण या मालिकेत भारताकडून सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब रिंकू सिंगला देण्यात आला. रिंकू सिंगला हे पदक संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डॉयश यांनी दिले.

भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी रवी बिश्नोई, रिंकू सिंग आणि रियान पराग यांना 'फिल्डर ऑफ द सीरीज' पुरस्कारासाठी नाव दिले, परंतु रिंकू जिंकला आणि विजेतेपद मिळवले. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी रिंकू सिंगला भारताचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणूनही घोषित करण्यात आले.

Gautam Gambhir Ind vs Sa
Paris Olympic 2024 : ऑलिंपिक नगरीत अन्नासाठी धावाधाव; क्रीडा नगरी, तसेच स्पर्धा केंद्रासंदर्भात परदेशी खेळाडू, सदस्यांकडून टीका

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रिंकू सिंगने गोलंदाजीतही अद्भुत कामगिरी केली, त्याने T20I मध्ये पाहिल्यांदाच गोलंदाजी केली. या सामन्याच्या दुसऱ्या डावात श्रीलंकेला विजयासाठी 12 चेंडूत 9 धावा करायच्या असताना कर्णधार सूर्यकुमार यादवने गोलंदाजीची धुरा रिंकू सिंगकडे सोपवली. यानंतर रिंकू सिंगने सामन्यात भारताला जवळपास विजयी स्थितीत आणले. त्याने या षटकात फक्त 2 धावा दिल्या आणि 2 श्रीलंकेच्या फलंदाजांनाही बाद केले, त्यापैकी एक होता कुसल परेरा जो 46 धावा करून खेळत होता. तो आऊट झाल्यानंतर सामन्याचे चित्र बदलले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.