IND vs SL ODI Team : ट्वेंटी-२०तील पराभवातून धडा घेतला, श्रीलंकेने वन डे साठी द्विशतकवीर मैदानावर उतरवला

India vs Sri Lanka ODI Series : ट्वेंटी-२० मालिकेतील पराभवानंतर यजमान श्रीलंकेने ३ सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी आज तगडा संघ जाहीर केला.
Sri Lanka ODI Team
sri Lanka ODI Teamsakal
Updated on

India vs Sri Lanka ODI Series : भारताविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी यजमान श्रीलंकेने आज १६ सदस्यीय संघ जाहीर केला. २४ वर्षीय निशान मदुश्का याला पदार्पणाची संधी दिली गेली आहे, तर चरीथ असलंका वन डे संघाचे नेतृत्व करणार आहे. वन डे मालिका कोलंबोमध्ये २ ऑगस्टपासून सुरू होत असून तिन्ही सामने आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. ४ आणि ७ ऑगस्टला दुसरी व तिसरी वन डे होईल.

श्रीलंकेच्या संघाला ट्वेंटी-२० मालिकेत भारताकडून मार खावा लागला. दोन सामन्यांत भारताने विजय मिळवून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. आज तिसऱ्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे टॉसला उशीर होत आहे. या ट्वेंटी-२० मालिकेतील बरेचसे खेळाडू वन डे मालिकेतही पाहायला मिळणार आहेत. श्रीलंकेत ५ कसोटीत ४२च्या सरासरीने ५४७ धावा करणाऱ्या निशानला संधी दिली गेली आहे. २०५ धावा हा त्याचा कसोटीतील वैयक्तिक सर्वोत्तम खेळ आहे. त्यामुळे तो भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवेल का, याची उत्सुकता आहे.

sakal

रोहित, विराट यांची सुट्टी संपली

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर सुट्टीवर गेलेले रोहित शर्मा, विराट कोहली हे सीनियर्स खेळाडू या मालिकेतून पुन्हा अॅक्शनमध्ये दिसणार आहेत. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या विनंतीचा मान राखून ही दोघं वन डे मालिकेत सहभागी झाले. त्यांच्यासह कुलदीप यादव, हर्षित राणा, श्रेयस अय्यर आदी खेळाडूही कोलंबो येथे दाखल झाले आहेत आणि या सर्वांनी सरावालाही सुरूवात केली आहे.

श्रीलंकेचा वन डे संघ - चरिथ असलंका ( कर्णधार), पथूम निसंका, अविष्का फर्नांडो, कुशल मेंडिस, सदीरा समराविक्रमा, कमिंदू मेंडिस, जनिथ लियानागे, निशान, वनिंदू हसरंगा, दुमिथ वेल्लालागे, चमिका करुणारत्ने, महीष थिक्षणा, अकिला धनंजया, दिलशान मदुशंका, मथिशा पथिराणा, असिथा फर्नांडो.

भारताचा वन डे संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग , अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.