IND vs SL : Gautam Gambhir चं निम्म टेंशन कमी झालं; भारताविरुद्ध 'दादागिरी' करणाऱ्या श्रीलंकन गोलंदाजाची माघार

India vs Sri Lanka - श्रीलंका क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी काल संघ जाहीर केला आणि आज त्यांच्या प्रमुख गोलंदाजाने स्पर्धेतून माघार घेतली.
Dushmantha Chameera ruled out
Dushmantha Chameera ruled outsakal
Updated on

India vs Sri Lanka T20I series : भारत-श्रीलंका यांच्यात २७ जुलैपासून ३ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला असून त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जडेजा या तीन सीनियर खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तून निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाची ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे युवा खेळाडूंवर मोठी जबाबदारी असणार आहे. या मालिकेसाठी यजमान श्रीलंकेनेही तगडा संघ जाहीर केला. पण, काल जाहीर केलेल्या संघातून आज एका प्रमुख गोलंदाजाने माघार घेतल्याची बातमी समोर येत आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर वनिंदू हसरंगाने कर्णधारपद सोडले होते आणि भारताविरुद्धच्या मालिकेत चरिथ असलंका ( Charith Asalanka) याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली गेली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत स्थान न मिळालेला दिनेश चंडीमल या मालिकेतून ट्वेंटी-२० संघात परतला आहे. चेन्नई सुपर किंग्जचे स्टार खेळाडू मथिशा पाथिराना आणि महिषा थिक्षाना यांनाही संधी मिळाली आहे. या दोघांनी लंका प्रीमियर लीगमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती.

Dushmantha Chameera ruled out
IND vs SL: Hardik Pandya ची सराव सत्रात सहाय्यक प्रशिक्षकासोबत हुज्जत, वाद मिटवण्यासाठी पत्रकाराची मदत

यजमान श्रीलंकेचे पारडे या मालिकेत जड मानले जात असताना त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख जलदगती गोलंदाज दुश्मंथा चमिरा ( Dushmantha Chameera) याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याचे वृत्त तेथील पत्रकारांनी दिले आहे. चमिराने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ५५ सामन्यांत ५५ विकेट्स घेतल्या आहेत. यापैकी त्याने भारताविरुद्ध १५ सामन्यांत १६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या माघारीबाबत श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही आणि त्याच्या रिप्लेसमेंटबाबतही घोषणा केलेली नाही.

श्रीलंकेचा ट्वेंटी-२० संघ : चरिथ असलंका (कर्णधार), पथूम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वनिंदू हसरंगा, दुनिथ वेलागे, महेश थिक्षाना, चामिंडू विक्रमसिंघे, चमिंडू विक्रमसिंघे, मथिसा पथिराना, बिनुरा फर्नांडो, दुश्मंथा चमिरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.