Team India for Sri Lanka Tour - गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर काही बदल पाहायला मिळत आहेत. वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जडेजा या सीनियर्सनी ट्वेंटी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. याही मागे गौतम गंभीर कारण असल्याची चर्चा रंगलेली. कारण, गौतमचा कल युवा खेळाडूंकडे आहे. पण, त्याचवेळी सीनियर्सनी वन डे व कसोटी क्रिकेटमध्ये खेळत रहावे लागेल हेही त्याने स्पष्ट केले आहे. कारण, आगामी काळात भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याची संधी आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर गौतम गंभीरचे पुढील लक्ष्य हे भारत व श्रीलंका येथे संयुक्तपणे २०२६ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपकडे लागले आहे. त्यासाठी त्याने आतापासून तयारी सुरू केली आहे. याची सुरुवात आगामी श्रीलंका दौऱ्यातून होणार आहे आणि त्यामुळेच या दौऱ्यावरील ट्वेंटी-२० मालिकेत संघात कोणाची निवड होते आणि कर्णधार कोण, याची उत्सुकता आहे. वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) जरी उप कर्णधार होता आणि त्याच्याकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व जाईल, अशी शक्यता होती.
हार्दिकची तंदुरुस्ती हे प्रमुख कारण आहे जे त्याला ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद कायमचे मिळू देऊ शकत नाही. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी ट्वेंटी-२० मालिकेसाठी पांड्या उपलब्ध असूनही, त्याच्याकडे कर्णधारपद नसेल. ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav Captain) हे नाव आघाडीवर आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आठ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये सूर्याने भारताचे नेतृत्व केले होते. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांचीही सूर्यालाच पसंती आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार गंभीर आणि आगरकर यांनी मंगळवारी संध्याकाळी पांड्याशी याबाबत चर्चा केली. त्यांनी संघात स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी दीर्घकालीन पर्याय निश्चित करण्याचा निर्णय त्याला सांगितला. ट्वेंटी-२० मालिका २७ ते ३० जुलै दरम्यान पल्लेकेले येथे होणार आहे, त्यानंतर २ ते ७ ऑगस्ट दरम्यान कोलंबो येथे वन डे सामने होणार आहेत.
हार्दिकने श्रीलंका दौऱ्यातील वन डे मालिकेत खेळणार नसल्याचे बीसीसीआयला कळवले आहे. India vs Sri Lanka वन डे मालिका २ ते ७ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. पण, हार्दिकने वैयक्तिक कारणास्तव या मालिकेत खेळू शकत नसल्याचे बीसीसीआयला सांगितले आहे. हार्दिक व पत्नी नताश स्टँकोव्हिच यांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.